D.A. Difference Calculator, महागाई भत्ता कॅल्क्युलेटर

D.A. Difference Calculator 



 डी.ए. फरक कॅल्क्युलेटर 

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर

फक्त आपले बेसिक टाका 

आणि 01 जानेवारी ते 30 जून 2024 पर्यंतचा महागाई भत्ता फरक पहा.

D.A. Difference पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.educationalways.co.in/2023/06/d-arrears-difference-calculator.html


सौजन्य - कादिर खान सर, ठाणे 


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मच अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत.


वाचा भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांकः १/१/२०२४-इ.। (बी), दिनांक १२ मार्च, २०२४


शासन निर्णय -


राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.


२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६% वरुन ५०% करण्यात यावा, सदर महागाई मत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३० जून, २०२४ या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै, २०२४ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.


3. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.


४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध


करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०७१०१०५२२८९५०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


Post a Comment (0)
Previous Post Next Post