गणित जम्बो टेस्ट क्र. 08 - मसावी लसावी,
Mathematics Jumbo Test - Masavi Lasavi,
LCM,HCF - least common multiple highest common factor.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती, गणित आठवी, शिष्यवृत्ती गणित, सैनिक स्कूल,NMMS भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन, श्रेया, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी मसावी व लसावी या घटकावर आधारित सराव चाचणी सोडवा.
हे लक्षात ठेवा 👇
• लघुतम सामाईक विभाज्य (लसावि): ज्या दोन किंवा अधिक संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान विभाज्य संख्या म्हणजेच लसावि होय.
उदा. 16 व 24 चा लसावि काढताना
16 चे विभाज्य = 16, 32, 48, 64, 80, 96, 112, 128, 144
24 चे विभाज्य = 24, 48, 72, 96, 120, 144, 216
सामाईक विभाज्य = 48, 96, 144
लहानात लहान विभाज्य संख्या म्हणजेच लसावि = 48
• महत्तम सामाईक विभाजक (मसावि) दोन किंवा अधिक संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या विभाजकाने भाग जातो त्या विभाजकाला मसावि म्हणतात.
उदा. 72 व 48 चा मसावि काढताना -
72 चे सर्व विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 9, 12, 18, 24, 36, 72
48 चे सर्व विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24, 48
सामाईक विभाजक = 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24
मोठ्यात मोठा विभाजक (मसावि) = 24
# क्रमवार दोन किंवा अधिक संख्यांचा मसावि 1 येतो त्या संख्यांना तसेच 1 मसावि येणाऱ्या सर्व संख्यांना परस्पर मूळ संख्या म्हणतात.
# क्रमागत दोन संख्यांचा लसावि हा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो.
# कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावि व मसावि यांच्या गुणाकाराएवढा असतो.