सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त 1000 पेक्षा जास्त मराठी समानार्थी शब्द
एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
मराठी भाषेमध्ये एका शब्द ऐवजी अनेक शब्द एकाच गोष्टीचा निर्देश करतात म्हणून त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.
खाली काही समानार्थी शब्दांचे संकलन आपल्यासाठी देण्यात आलेले आहे. हे शब्द वहीत लिहून ठेवा आणि पाठ करा.
'अ' पासून सुरु होणारे शब्द
अनल = अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर , आग, विस्तव, आगेल, ज्वाला, अंगार, वडवानल, वनवा, जाळ, अग्निशिखा
अभिनय = हावभाव, अंगविक्षेप.
अभिनेता = नट.
अभियान = मोहीम.
अमित = असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
अमृत = पीयूष, सुधा
अरण्य = रान, कानन, वन, विपिन, जंगल.
अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन.
अश्व = घोडा, हय, तुरंग, तुरंग, तुरंगम, वारू, वाजी
अही = सर्प, साप, भुजंग, व्याल.
अधू = अपंग व्यंग असलेला, कुरूप, पंगू, अईबदार,
अधोगती = पतन, दुर्गती, अवनती, अधःपात,अपकर्ष, अध: पतन, ऱ्हास, उतरती कळा.
अध्यात्म = आत्म्याबद्दलचे ज्ञान, ब्रह्मज्ञान, वेदान्त, परमात्म्याविषयी ज्ञान, अद्वैत.
अध्याय = खंड, पर्व, विभाग, प्रकरण अध्रुव - अल्पकालिक, चंचल, क्षणभंगुर
अनंग = अंगरहित, निराकार, मदन, कामदेव, शिव, शंकर
अरिष्ट = अनर्थ , संकट, अर्थहीनता, निरर्थक,अर्थशून्य
अनशन = उपवास, निराहार, अन्नत्याग
अनसूया = मत्सराशिवाय, अत्रिपत्नी
अनाठायी = अयोग्य, तर्कविरहित
अनाड = अडाणी, उनाड, द्वाड
अनाथ = पोरका, आईवडिलांशिवाय, दीन,निराश्रित, निराधार, असाहाय्य
अनिल = वायू, वारा, अष्टवसूंपैकी एक
अनावर = अनिर्बंध, मोकाट, उच्छृंखल, अनियंत्रित, निरंकुश, बेछूट, बेफाम, बेभान.
अवलोकन = निरीक्षण, पाहणी
अवशिष्ट = बाकी, उरलेले, उर्वरीत, शेष
अविदग्ध = अडाणी, मूर्ख, मूढ, अज्ञानी
अव्याहत = अबाधित, अखंड, अविरत, अखंडीत, निरंतर, अक्षय.
अशक्त = रोडका, दुर्बल, क्षीण, कमजोर, दुबळा,कमकुवत,शक्तिहीन, बलहीन, सामर्थ्यहीन.
अशाश्वत = क्षणभंगुर, क्षणिक
अशिष्ट = असभ्य, लज्जास्पद
अशुभ = पातक, अभद्र,अमंगलपणा, शुभ नसलेले, अनिष्ट.
अश्लाघनीय = निंद्य, अप्रशंसनीय, अशिष्ट, अभ्य
अश्वत्थ = पिंपळाचे झाड
अष्टौप्रहर = रात्रंदिवस, सतत, अहर्निशी
असमंजस = बुद्धिहीन, अविवेकी, अविचारी, मूर्ख
असामी. = इसम, व्यक्ती, माणूस, प्रतिष्ठित व्यक्ती
असुर = दैत्य, राक्षस, दानव
असुरवाड = दुःख, क्लेश, त्रास
असूया = मत्सर, हेवा, द्वेष
अस्त = अंतर्धान, लोप, शेवट
अस्तमान = मावळणे, अस्ताची वेळ
अस्पताल = रुग्णालय, इस्पितळ, दवाखाना
अहिवा = अविधवा, सुवासिनी, सौभाग्यवती, अहेव, सवाष्ण, आयाव, सधवा
अनुरक्त = इच्छायुक्त, अनुरागी, प्रेमबद्ध, आसक्त
अनुरूप = सुसंगत, जुळणारे, शोभणारे, यथायोग्य, यथोचित
अनुशासन = आज्ञा, कायदा, नियम, व्यवहार
अनुशीलन = परिशीलन, हव्यास, आसक्ती
अनुषंग = संगती, भागीदारी, सोबत
अन्वय = संबंध, आधार, संयोग
अन्वेषण = शोध, संशोधन, चौकशी
अपकार = इजा, नुकसान, दुःख, दुष्कृत्य
अपजय = पराजय, पराभव
अपमान = अनादर, मानभंग, अप्रतिष्ठा, अवज्ञा,अवमान, मानहानी, अवहेलना, तेजोभंग, बेइज्जत,मानखंडना, उपहास, उपमर्द, पाणउतारा
अपंग = व्यंग, लुळा, विकल, पंगू, विकलांग,दिव्यांग, पांगळा
अपत्य = मूल, संतान, संतती
अपभ्रंश = विकार, नाश, हानी, मूळ भाषेतील शब्दाची विकृती
अपरोक्ष = साक्षात, समक्ष, प्रत्यक्ष
अपहार = उचलेगिरी, लाचलुचपत, आर्थिक अफरातफर, फसवणूक, गंडवणे
अपक्षय = न्हास, उतार, क्षय
अप्रतिम = अजोड, अद्वितीय, अतुल्य, अनुपम,अतुलनीय, उत्कृष्ट, अलौकिक, असामान्य
अफवा = कंडी, वाती, भुमका, वदंता, वावडी,खोटी बातमी, आवई, कीवदती, गावगप्पा
अहंकार = गर्व , घमेंड
अनर्थ = अरिष्ट, संकट, अशुभ गोष्ट.
आ - पासून सुरु होणारे समानार्थी शब्द
आशा - अपेक्षा, आस, आकांक्षा, इच्छा, वासना
आसरा - आधार, आडोसा, आश्रयस्थान
आळ - आरोप, गल्ली, राग, दोषारोप
आकाशवाणी-नभोवाणी
आवाहन - विनंती
आसूड - चाबूक
आक्रमण - हल्ला, चढाई
आकर्षक - मोहक, मनोहर
आभरण - अलंकार
आगमनिर्गम - आरंभ व शेवट, येणे-जाणे
आक्रोश - आकांत, आक्रंदन, रूदन, हंबरडा
आकडा - संख्या, अंक, वाकदार टोक, विंचवाची किंवा खेकड्याचीनांगी, टोक, शेंडा, छत्रीचा घोडा
आकडी थंडीने भरणारे कापरे, पोटातील रोग, उंचावरील वस्तू तोडण्यासाठी काठीला कोयती बांधून केलेले साधन, निरसे दूध
आगार -घर, मंदिर, वाडा, संचय, खाण
आय - आई, नफा, उत्पन्न, कुंडलीतील अकरावे स्थान, अलुते बलुते, लोखंड, आरोप, आकार, स्वरुप
आयनी - इच्छा, हेतू मन, बुद्धी, मत, चांगली चाल, मालिका, चातुर्य, युक्ती, अभिमान, पंखा
आई - जननी, जन्मदात्री, माऊली, माता, माय.
आकांत- अनर्थ, आक्रोश, कोलाहल, हंबरडा, रुद
आकार - आकृती, घडण, ठेवण, रुप
आकांक्षा - अपेक्षा, आशा, इच्छां
आगळा- अधिक, जास्त, पुष्कळ, मोठा, वरचढ
आघात - गुद्दा, तडाखा, धक्का, प्रहार
आच - काळजी, विस्तवाची झळ, धग, शेक
आत्मा - चैतन्यतत्व, जीवात्मा, परब्रम्ह, जीव, प्राण
आठवण - ध्यान, स्मरण, सय, स्मृती, संस्मरण
आदर - पाहुणचार, मान, श्रद्धा, सत्कार
आनंद - उल्हास, मोद, संतोष, हर्ष
आप - उदक, जल, पाणी
आपत्ती - अडचण, दूर्दशा, संकट
आभास - अंदाज, अटकळ, कल्पना, भास, सारखेपण
आमिष - प्रलोभन, बक्षीस, भक्ष्य, मधाचे बोट लालच
आयुष्य - उमर, वय, हयात, जीवीतकाळ
आरंभ - प्रारंभ, पायंडा, सुरूवात
आराधना - उपासना, प्रार्थना, पूजा, सेवा
आर्त - आतुरता, इच्छा, उत्कंठा, तळमळ
आवाज- ध्वनी, नाद, शब्द
'इ' पासून सुरू होणारे समानार्थी शब्द
इंगित - अभिप्राय, अंतर्गत, अर्थ, अंतस्थः हेतु
इज्जत - अब्रू, कीर्ती, प्रतिष्ठा, मान, थोरवी.
इतर - अन्य, दुसरा, निराळा, वेगळा
इंदिरा - कमला, लक्ष्मी, भगवती
इंद्र - देवेंद्र, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष
इमानी - प्रामाणिक
इतमाम - सरंजाम, थाट, व्यवस्था
इतराज - नाखुष, रुष्ट,
नाराज-नापसंती, नाकबुली, निषेध
इन्साफ - न्याय, निर्णय
इतिकर्तव्यता-कर्तव्याची समाप्ती
इनाम- इनामत, देणगी, बक्षीस
पुढील दिलेल्या लिंकवर 'ई, उ ते ज्ञ पासून सुरू होणारे समानार्थी शब्द दिले आहेत.
पुढील शब्द लवकरच अपडेट करण्यात येतील.