वनसंपदा - सातवी/आठवी BTS practice Test, स्पर्धा परीक्षा,Forestry

वनसंपदा - सातवी/आठवी BTS practice test 

स्पर्धा परीक्षा,Forestry,

भारत टॅलेंट सर्च


• वनसंपदा •
• घनदाट झाडी, वेली, पशु पक्षी यांच्या नैसर्गिक अधिवासात असलेल्या संपदेला वनसंपदा म्हणतात.
• वनसंपदा म्हणजे प्राकृतिकरित्या आढळणारी संपदा.
• वनस्पती या जीवावरणाचा महत्वाचा घटक आहेत.
• मृदा, हवामान, पर्जन्य यामध्ये भारतात लक्षणीय फरक असून, भारतात प्रचंड मोठी जैवविविधता आढळते.
• एकेकाळी भूपृष्ठाच्या 50 टक्के भाग हा जंगलांनी व्यापलेला होता.
• एकूण क्षेत्रफळाच्या 33 टक्के भूभाग हा वनांनी व्यापलेला असावा, असे मानले जाते.
• औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे वनांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे.
• वनांमुळे पर्यवरणाचा समतोल राखला जाऊन जलचक्राचे नियमन व भूपृष्ठाचे संरक्षण होते.
• वनसंपदा टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी, प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित करण्यासाठी भारतात अनेक राष्ट्रीय अभयारण्य निर्माण केली आहेत. उदा. महाराष्ट्रातील ताडोबा हे वाघांसाठीचे अभयारण्य.
• नद्या, त्यांचा उगम आणि त्यांच्या वाहण्याचा मार्ग ही माहिती ही मनोरंजक आहे.
• नद्यांच्या खोऱ्यातच धरणे बांधून सिंचनाच्या चांगल्या सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उदा. जायकवाडी धरण.
• वनसंपदा आपल्या अनेक गरजा भागवते. उदा. लाकूड, औषधी वनस्पती इ. त्यामुळे त्यांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.


  
Post a Comment (0)
Previous Post Next Post