गणित - संख्यावाचन - नवोदय, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा,
सराव चाचणी सोडवा.
Numerology,
Navodaya, scholarship,BTS, MTS, BDS, myvision, Jnvst govardhan shinde, sainik school
चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेली माहिती वाचा आणि शेवटी चाचणी सोडवा.
संख्यांचे वाचन लेखन करताना आपण दशमान पद्धतीचा वापर करतो. एकक स्थानापासून डावीकडील प्रत्येक स्थान हे दहा पटीने वाढत जाते.
कोणत्याही संख्यांच्या वाचनाची पद्धत खालील प्रमाणे असते.
उजवीकडून गट करून वाचल्यास सोयीचे जाते शतक, दशक, एकक हा गट क्रमांक एक यानंतर डावीकडे दोन दोन स्थानाचा गट करावा.
उदाहरणात 15475 ही संख्या वाचताना पंधरा हजार चारशे पंच्याहत्तर अशी वाचतात.
सख्या अंकात लिहिताना, प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक लिहावा नतर त्यापेक्षा लहान स्थानावर दिलेल्या संख्येतील योग्य अंक लिहावा
एखाद्या स्थानावर अंक नसेल तर त्या स्थानावर '0' हा अंक लिहावा
उदा. सात कोटी तीनशे चौदा या संख्येत, कोटी स्थानावर 7 लिहून दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार या प्रत्येक स्थानांवर '0' लिहावे लागेल आणि मग 3. 1.4 हे अंक अनुक्रमे श. द. ए. या स्थानी लिहावे
याप्रमाणे सख्या अकात लिहिण्याचा सराव करा उदा (1) चार अब्ज तेरा कोटी पंधरा लक्ष चोवीस हजार एकशे बारा ही सख्या अंकात लिहा उत्तर 4, 13, 15, 24. 112