🔰 RTE 25% प्रवेश सोडत (लॉटरी) 2024-25 Live थेट प्रक्षेपण
सन २०२४-२५ वर्षासाठी RTE २५% प्रवेश सोडत (लॉटरी) कार्यक्रमाचे प्रक्षेपण
दिनांक ०७.०६.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
https://youtube.com/live/bNqUW9iKSX0?feature=share
RTE 25 % प्रवेश प्रक्रियेचे नियम आणि पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेत.
https://www.gsguruji.in/2024/05/rte-25-2024-25last-date-of-registration.html
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१.
दुरध्वनी: (०२०) २६१२५६९२
ई-मेल depmah2@gmail.com
जा.क्र./प्राशिसं/आरटीई ८०१/२०२४/३९६३
दिनांक: ०६/०६/२०२४
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई. मनपा.
३) शिक्षण निरिक्षक बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
विषय : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत सन २०२४-२५
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक ०७/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे. आपणास ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता
https://youtube.com/live/bNqUW9iKSXO?feature=share
लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर कार्यक्रमास आपल्या स्तरावरुन व्यापक स्वरुपात मोफत प्रसिध्दी देण्यात यावी.