उतारा क्रमांक 02 - मराठी उतारे,
उतारा वाचन व आकलन
खाली दिलेल्या उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न लिहून घेऊ शकता किंवा copy करून ठेवू शकता.
खाली दिलेल्या उताऱ्या खालील प्रश्नांची उत्तरे शेवटी दिलेली आहेत.
माय व्हिजन – नवोदय ऍडमिशन
राज्यव्यापी उपक्रम – मोफत मार्गदर्शन
Channel Name – Govardhan shinde's knowledge bridge
संपर्क – गोवर्धन शिंदे 9421486014
उतारा क्र 02
डोळसपणे पाहिल्यास सर्प हे शत्रू नसून मित्र असतात. भारतात मोठ्या प्रमाणात भात, गहू, ऊस यांची शेती केली जाते. या पिकांचे उंदीर, ससे अतिशय नुकसान करतात. त्यांना परस्पर नष्ट करण्यास साप अत्यंत उपयोगी असतात. उंदीर, ससे यांच्यामार्फत अक्षरशः लक्षावधी टन धान्य नष्ट केले जाते. साप डूक धरतो, पुरातन वास्तूत वास्तव्य करून असतो. अमावस्या-पौर्णिमेला हमखास दंश करतो. या समजुती अत्यंत घातक असतात. त्यासाठी योग्य शिक्षण देणे एक उपाय आहे.
प्र. 1) साप मित्र असल्याचे आपल्या लक्षात कसे येईल ?
A) उंदरांची संख्या पाहिल्यास
B) डोळसपणे पाहिल्यास
C) पिकांचे उत्पन्न वाढल्यास
D) साप बाळगल्यास
प्र. 2) कोणामुळे धान्याचे नुकसान होते ?
A) उंदीर व ससे यांच्यामुळे
B) सापामुळे
C) जनावरांमुळे
D) मनुष्या मुळे
प्र. 3) घातक समजुती दूर करण्याचा उपाय कोणता ?
A) सापाची पूजा करणे
B) सापांना खाद्य देणे
C) उंदरांचा नाश करणे
D) योग्य शिक्षण देणे
प्र. 4) आपल्याकडे कोणते गैरसमज आहेत ?
A) साप डूक धरतो
B) साप पुरातन वास्तुत राहतो
C) साप अमावस्येला दंश करतो
D) सर्व पर्याय बरोबर
प्र. 5) ‘अरी’ या शब्दाचा उताऱ्यात आलेला समानार्थी शब्द कोणता ?
A) सर्प
B) मित्र
C) ससा
D) शत्रु
उत्तरे
1) B
2) A
3) D
4) D
5) D