उतारा क्रमांक 01 - मराठी (भाषा) उतारे,Marathi Utare

 उतारा क्रमांक 01 - मराठी (भाषा) उतारे,



Marathi Utare 

विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेले उतारे वहीमध्ये लिहून घ्या किंवा याच ठिकाणी सोडवा आणि या उताऱ्या खालील प्रश्नांची उत्तरे शेवटी दिलेली आहेत.

                          माय व्हिजन – नवोदय ऍडमिशन

                     राज्यव्यापी उपक्रम – मोफत मार्गदर्शन

       Channel Name – Govardhan shinde's knowledge bridge

                    संपर्क – गोवर्धन शिंदे 9421486014


                                                 उतारा क्र  01


     नारळ हे फळ (बी) आहे. या फळास बाहेरून सुरुवात केल्यास 1) बाह्यकवच 2) मध्यावरण या पासून पुढे काथ्या वगैरे करतात . 3) अंतराच्छादन म्हणजे करवंटी अशी आवरणे असतात व सर्वात आतल्या बाजूस बीजपोषक पदार्थ म्हणजेच खोबरे असते. यामुळेच गर्भाला वाढीसाठी अन्नपुरवठा होऊ शकतो. बीजक हा गर्भ डोळ्याच्या खालील खोबऱ्यामध्ये असतो. खरे म्हणजे हा सर्व पोकळ भाग खोबऱ्यानेच भरावयास हवा. निसर्गाने (वजन वाढेल म्हणून म्हणा किंवा तेवढी खोबरे तयार करणे शक्य नाही म्हणून म्हणा) त्याऐवजी पाणीच ठेवले. हे पाणी म्हणजे खोबऱ्याचे रूपांतरण न झालेला भाग. हे पाणी शर्करायुक्त पदार्थामुळे गोड लागते. फलधारणा होत असताना किंवा विशिष्ट जंतूंनी आत प्रवेश केल्यामुळे ते नासते .


प्र 1)   बीज पोषक पदार्थ कुठे असतो?

A)   नारळाच्या कवटी भोवती 

B) खोबऱ्याच्या आत 

C) सर्वात आतल्या बाजूस

D) नारळाच्या शेंडीजवळ


प्र 2)    नारळाला किती आवरणे असतात?

A)    एक 

B)   दोन 

C)   तीन 

D) चार


  प्र 3)   बिजक कोठे असते?

A)    नारळाच्या बाहेर 

B)    नारळाच्या पाण्यात 

C)    नारळाच्या मुळाजवळ

D)   गर्भ डोळ्याच्या खाली


प्र  4)     नारळातील पाणी कशामुळे नासते ?

A)    पाण्याची साखर तयार होताना 

B)    खोबरे तयार न झाल्यामुळे 

C)   नारळ जमिनीवर पडल्यामुळे 

D)    विशिष्ट जंतूंनी आत प्रवेश केल्यामुळे


प्र  5)   कोणती गोष्ट अशक्य आहे?

A) सर्व पोकळ भाग खोबऱ्याने भरणे

B) नारळात पाणी असणे

C) नारळातील पाणी पूर्ण आटने

D) नारळात खोबरे तयार न होणे



उत्तरे

1) C

2) C

3) D

4) D

5) A


Post a Comment (0)
Previous Post Next Post