भाषण - अण्णाभाऊ साठे जयंती विशेष, छोटे भाषण - सोपे भाषण, मराठी, इंग्रजी भाषेत भाषण,speech on Annabhau sathe

भाषण - अण्णाभाऊ साठे जयंती विशेष, 

Anna bhau sathe


छोटे भाषण - सोपे भाषण,

मराठी, इंग्रजी भाषेत भाषण,

speech on Annabhau sathe in Marathi and English 

खाली दिलेले भाषण लिहून घ्या सराव करा आणि आत्मविश्वासाने सादर करा.

मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जीवन परिचय व्हावा आणि समाजाला त्यांची प्रेरणा मिळावी या उद्देशाने आपण विविध कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमांमध्ये छोटी छोटी भाषणे विद्यार्थी करत असतात.

अण्णा भाऊ साठे जयंती विशेष राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा सोडवा.

https://govardhanshinde.blogspot.com/2023/08/online-gk-test-108-quiz-on-birth.html

 अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन परिचय देणारी भाषणे मराठी व इंग्रजी भाषेतून आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.

मराठी भाषण क्रमांक 01

         शब्दांची खान, महाराष्ट्राची शान .... 

        बहुजनाची आण, साहित्याची मान ...

        अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी.. !

 सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो..

       सर्वांना माझा नमस्कार...!

  सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ... !

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला.

त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते.

त्यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही. त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागला.

न शिकता ही त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली तसेच लोकशाहीर म्हणून नावलौकिक मिळविला.

रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते पहिले भारतीय होते.

अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, लावणी यांची निर्मिती केली.

त्यांच्या 'फकीरा' या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे.

त्यांची 'मुंबईची लावणी' व 'माझी मैना गावावर राहिली' या लावण्या अविस्मरणीय आहेत.

भारताच्या साहित्यातील साहित्यरत्न, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले.

अशा या महान व्यक्तिमत्त्वास माझा मानाचा मुजरा.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद !  जय महाराष्ट्र !  जय अण्णा !

     

मराठी भाषण क्रमांक 02

      सर्वांना नमस्कार...

माझे नाव  ............. आहे.

मी आज आपल्यासमोर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी बोलणार आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे थोर समाज सुधारक, लेखक व शाहीर होते.

 त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते.

 त्यांचा जन्म एक ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे होते आणि आईचे नाव वालुबाई होते.

शिवरायांचे चरित्र अण्णाभाऊंनी पोवाड्यातून रशियापर्यंत नेले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी 18 जुलै 1969 रोजी जगाचा निरोप घेतला.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना माझे विनम्र अभिवादन !


मराठी भाषण क्रमांक 03

        जात हे वास्तव आहे,

        गरीबी ही कृत्रिम आहे.

         गरीबी नष्ट करता येऊ शकते,

         जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.


1) सर्वांना माझा नमस्कार ....

2) माझे नाव   .....आहे.

 3) आज मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी बोलणार आहे.

4) अण्णाभाऊ साठे हे एक लेखक, लोककवी आणि समाज सुधारक होते.

5) अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला.

6) अण्णाभाऊ साठे हे स्वतः अशिक्षित होते.

7) फक्त दीड दिवस शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊंनी 35 मराठी कादंबऱ्या लिहिल्या.

8) दलित साहित्याचे संपादक म्हणून त्यांना ओळखले जाते.

9) त्यांचे साहित्य हे महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात महत्त्वाचे योगदान मानले जाते.

10) 18 जुलै 1969 साली त्यांचा मृत्यू झाला.

              त्यांना माझा शतशः प्रणाम !


इंग्रजी भाषण क्रमांक 01

Speech in English

1) Hello everyone...


 2) My name is.....


   3) Today I am going to talk about democrat Annabhau Sathe.


 4) Annabhau Sathe was a writer, folk poet and social reformer.


 5) Annabhau Sathe was born on August 1, 1920 in Wategaon village of Sangli district.


 6) Annabhau Sathe himself was illiterate.


 7) Annabhau, who attended school for only one and a half days, wrote 35 Marathi novels.


 8) He is known as editor of dalit literature.


 9) His literature is considered to be an important contribution in the formation and transformation of Maharashtra.


 10) He died on 18 July 1969.


                My salute to them!



हिंदी भाषण क्रमांक 01


1) सभी को नमस्कार...


2) मेरा नाम है.....


3) आज मैं लोकतंत्रवादी अन्नाभाऊ साठे के बारे में बात करने जा रहा हूँ।


4) अन्नाभाऊ साठे एक लेखक, लोक कवि और समाज सुधारक थे।


5) अन्नाभाऊ साठे का जन्म 1 अगस्त, 1920 को सांगली जिले के वाटेगांव गाँव में हुआ था।


6) अन्नाभाऊ साठे खुद अनपढ़ थे।


7) सिर्फ़ डेढ़ दिन स्कूल जाने वाले अन्नाभाऊ ने 35 मराठी उपन्यास लिखे।


8) उन्हें दलित साहित्य के संपादक के रूप में जाना जाता है।


9) उनके साहित्य को महाराष्ट्र के निर्माण और परिवर्तन में महत्वपूर्ण योगदान माना जाता है।


10) 18 जुलाई 1969 को उनका निधन हो गया।


उन्हें मेरा सलाम!

Post a Comment (0)
Previous Post Next Post