गणित - जम्बो टेस्ट क्रमांक 06, विभाज्यतेच्या कसोट्या,
tests of divisibility,
हे जाणून घ्या :
विभाजक : ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला भागल्यावर निःशेष भाग जातो. त्या संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव म्हणतात.
उदा. 16 या संख्येस 1, 2, 4, 8, 16 या संख्यांनी भागल्यास बाकी शून्य ठरते म्हणून या सर्व संख्यांना 16 चे विभाजक किंवा अवयव म्हणतात.
कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 व सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते.
उदा. 35 चा सर्वात लहान विभाजक । व सर्वात मोठा विभाजक 35 होईल.
विभाजकांची संख्या मर्यादीत असते.
• कोणत्याही संख्येचा विभाजक हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा नसतो.
• एखादी संख्या तिच्या दोन अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरुपात मांडता येते.
उदा. 20 = 1 x 20 = 2 x 10 =4x5