शिक्षक दिन मराठी भाषण - Teachers day special speech,5 सप्टेंबर

शिक्षक दिन मराठी भाषण 

Teachers day speech


Teachers day special speech,

5 सप्टेंबर  शिक्षक दिनानिमित्त मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये सोपे भाषण - छोटे भाषण 

10 ओळीचे सोपे भाषण (एकूण 4 भाषणे)

मराठी भाषण क्रमांक 01

(हे भाषण 1 ली आणि 2 रीचे विद्यार्थी लिहून घेऊ शकतात)

1) सर्वांना माझा नमस्कार.

2) माझे नाव  .........आहे.

3) आज 5 सप्टेंबर आहे.

4) हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत.

5)  या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.

6)  प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्त्व असते.

7)  शिक्षक आपल्याला ज्ञान देतात.

8)  ते आपल्यावर चांगले संस्कार करतात.

9)  शिक्षक आपल्या कलागुणांना वाव देतात.

10)  आज आपण सर्व शिक्षकांना वंदन करूया.

                           धन्यवाद 

                 जय हिंद ! जय महाराष्ट्र !


मराठी भाषण क्रमांक 02

    (हे भाषण 3 री, 4 थी, 5 वी चे विद्यार्थी लिहून घेऊ शकतात)

      गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,
       गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे नमः ||

आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो,
       शिक्षक दिन हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खास दिवस असतो. या दिवशी आपण आपल्या शिक्षकांच्या कार्याची आणि त्यांच्याविषयीच्या आदराची भावना व्यक्त करतो. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि त्यांच्या आयुष्याचे शिल्पकार असतात.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे महान शिक्षणतज्ञ, तत्त्वज्ञ, आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो.

शिक्षक आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती असते. ते आपल्या ज्ञानाची झाडे रुजवतात, विचारांमध्ये दिशा दाखवतात, आणि आपल्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी सदैव प्रयत्न करतात. शिक्षकांमुळेच आपण चांगले नागरिक बनू शकतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले भविष्य उज्ज्वल होते.

शिक्षकांना मान-सन्मान देण्यासाठी शिक्षक दिन हा एक खास दिवस आहे, पण प्रत्यक्षात प्रत्येक दिवस हा त्यांच्या योगदानाची आठवण करतो. चला, आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचे आभार मानू आणि त्यांच्या शिक्षणाच्या कार्याला सलाम करूया.

धन्यवाद!

मराठी भाषण क्रमांक 03

  (हे भाषण 5 वी ते 7 वीचे विद्यार्थी लिहून घेऊ शकता)

आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
 आज, शिक्षक दिनाच्या या विशेष प्रसंगी, आम्ही आमच्या शिक्षकांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी एकत्र आहोत.  शिक्षक हे मार्गदर्शक दिवे आहेत जे आपले भविष्य घडवतात, मूल्ये रुजवतात आणि आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात.
 त्यांचे समर्पण, संयम आणि शिकवण्याची तळमळ आम्हाला केवळ शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट बनवण्यास मदत करत नाही तर आम्हाला अधिक चांगले मानव बनवण्यास देखील मदत करते.  ते आपल्याला कठोर परिश्रम, सचोटी आणि चिकाटीचे महत्त्व शिकवतात.
 या दिवशी, आपल्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या आपल्या सर्व शिक्षकांचे आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त करूया.  आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की तुम्ही आमचे मार्गदर्शक आणि आदर्श म्हणून आहात.
 तुमच्या अविरत पाठिंब्याबद्दल आणि आम्हाला स्वतःवर शंका असतानाही आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.  सर्व उत्कृष्ट शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!


 

मराठी भाषण क्रमांक 04

      (हे भाषण 7 वी, 8 वी, 9 वी आणि 10 वीचे विद्यार्थी लिहून घेऊ शकतात)

        पुज्यनिय विद्येची देवता सरस्वती माता (शारदा माता) यांची प्रतिमा, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच साहेब, माझ्या शाळेतील मुख्याध्यापक साहेब तसेच सर्व माझे गुरुजन विद्यार्थी विद्यार्थीनी.
मित्रांनो मी आज तुम्हाला शिक्षक दिवस या प्रसंगी शिक्षकांचे कर्तव्य, शिक्षकांचे महत्व, विद्यार्थीचे नाते शिक्षका बरोबर कसे असंते यावर विशेष बोलणार आहे.
दरवर्षी प्रमाणे आम्ही हयावर्षी सुद्धा शिक्षक दिवस साजरा करत आहोत. मित्रांनो आजचा दिवस जन्म म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मानतो. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ साली झाला. आंध्रप्रदेशच्या तिरुपती या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
मित्रांनो डॉ. सर्वपल्ली हे आधुनिक भारताचे एक आदर्श शिक्षक होते. जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांना भारताचे उपराष्ट्रपती पद देण्यात आले एवढेच नाही तर (रुष) रुस मध्ये भारताचे राजदुतची भुमिका त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. तेव्हा रुस मध्ये स्टालिन चा शासन होता. त्यांनी एकदा आपल्या भाषनात सांगीतले की शिक्षकांचे जीवन किती महान व नास्तिक आहे.
विद्यार्थी मिंत्रानो शिक्षक हे एक असं उपकरण आहे कि ज्यानं भले भले युगपुरुष महापुरुष त्यांच्या मार्गदर्शना ने घड़ले जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्पना चावला राजीव गांधी व श्रीकांत जीचकार मित्रांनो शिक्षक हे आपले दुसरे गुरु आहेत व (प्रथम) पहिले आई. गुरुंजींचा नेहमी आदर मान ठेवला पाहिजे. त्यांना नेहमी मान दिले पाहीजे कारण समाजाला घडवायला त्यांचा शिंहाचावाटा आहे.
मित्रांनो एका मराठी शिक्षकानी म्हटले होते कि हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांना जुमानत नाही. म्हणजे सोबत मद्यपान करणे. विरगुंळा करणे यात कसलाही मान मर्यादा नसतो. शिक्षक हे कधीच भेदभाव करत नसतात सर्व विद्यार्थीना एका नजरेने बघतात शिक्षक हे आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात अभ्यासात प्रत्येक विद्यार्थी परिपूर्ण व्हावा याची ते नेहमी जानीव घेतात. कधी कधी त्यांना विद्यार्थीला शिक्षा करावी लागते परंतु ती शिक्षा नसून ज्ञानरुपी आशिर्वाद आहेत. परंतु आज परिस्थिती उलट आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा केली तर पालक वर्ग बोंब ठोकतात म्हणूनच तर विद्यार्थी परिक्षेत काप्या करतात. आज विद्यार्थीने खऱ्या अर्थाने शिक्षकांना समजुन घेणे आवश्यक आहे. शिक्षणात कमजोर विद्यार्थीला त्याला प्रेमाने समजावे.
मित्रांनो सरकारने सुद्धा शिक्षकांवर खूप मोठी धावपळ केली आहे. अनेक प्रकारची शासकीय कामे त्यांच्या वर थोपवली जातात. म्हणूच विद्यार्थीचे खूप मोठं नुकसानहोते हे, प्रत्येक शिक्षकांना माहीतच आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या अंतीम समयी मोठ्या आत्मीयतेने रडत म्हणाले माझ्या हुद्द्यात परिवर्तन झाले आहे जसे गौतम बुद्धाच्या समोर अंगुलीमाल नावाचा डाकु आला होता.
विद्यार्थी मित्रांनो आपल्या या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात शिक्षक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवसी विद्यार्थी काहीतरी भेट वस्तू शिक्षकांना देतात जसे एकलव्याने आपली अंगठा दोन केलं होतं. शिक्षकांचा गौरव करणे म्हणजे विध्यार्थ्यांच्या विकासात वाढ करणे असं मी समझतो. आजच्या प्रसंगी मी त्या मराठी शिक्षक श्री हेमंत फुन्ने सर व राधा कृष्णन यांना खरी श्रद्धांजली वाहीतो व माझे भाषन इथेच संपवितो

Post a Comment (0)
Previous Post Next Post