भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी,Education Provisions in the Constitution of India, केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा 2025,Cluster Head,Tभारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी,Education Provisions in the Constitution of India, केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा 2025,TET EXAM

भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी,

Education Provisions in the Constitution of India, 

केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा 2025,

Cluster Head

केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2025

पेपर क्रमांक 02

 शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह

घटक क्रमांक 01

भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी :

  

भारतीय राज्यघटना


  भारतीय राज्यघटनेत शिक्षणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कलमांचा समावेश आहे.

1) कलम 21 (A)

          सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व बालकास मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क या कलमानुसार प्राप्त झाला आहे.

2) कलम 28 :

        कलम 28 नुसार विवक्षित शैक्षणिक संस्था मध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य.

        या कलमानुसार पालकांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण संस्थांना कोणतेही धर्मशिक्षण विद्यार्थ्यांवर लादता येणार नाही.

3) कलम 29 :

            कलम 29 अन्वये प्रत्येक व्यक्तीस आपल्या स्वतःची वेगळी भाषा, लिपी, संस्कृती टिकविण्याचा आणि ती जतन करण्याचा हक्क आहे.

4) कलम 30 :

          कलम 30 अन्वये अल्पसंख्यांकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क आहे.

5) कलम 41 : 

           शिक्षणाच्या आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्यचालक राज्य सरकार आपल्या आर्थिक व इतर विकासाच्या मर्यादा लक्षात घेऊन शिक्षणाचा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न करेल.

6) कलम 45 :

           सहा वर्षाखालील मुलांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद या कलमान्वये राज्यघटना अमलात आल्यापासून मोफत व सक्तीचे शिक्षण द्यावे अशी तरतूद आहे.

7) कलम 46 : 

        समाजातील दुर्बल घटकांच्या विशेषतः अनुसूचित जाती व जमाती यांच्या शैक्षणिक सुविधांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची तरतूद आहे.

8) कलम 51 (A) :

            या कलमानुसार मातापित्याने किंवा पालकाने आपल्या वय वर्ष सहा ते 14 मधील बालकास शिक्षणासाठी शाळेत पाठवणे आवश्यक असेल नव्हे तर ते प्रत्येक पालकाचे मूलभूत कर्तव्य असेल.

9) कलम 243  (B) अकरावे परिशिष्ट  :

        कलम 243 नुसार राज्यात पंचायतीची ग्रामस्थारावर स्थापना करण्यात आली त्यामध्ये पंचायतीच्या कार्यात शिक्षण या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.


10) कलम 338 (1) 339 (1) आणि 340 (1)

        या कलमानुसार S.C. S.T. आणि ओबीसी या प्रवर्गातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च  शिक्षणापर्यंत फी माफीची सवलत लागू असेल.

11) कलम 350 A :

            प्राथमिक स्तरावरील शिक्षण मात्र भाषेतून घेण्याची सुविधा, भाषिक अल्पसंख्यांक मुलांनाही त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याची सुविधा या कलमान्वये उपलब्ध करून देण्यात. आली आहे.


माहितीस्तव संकलन 


या घटकावर ऑनलाइन टेस्ट सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post