जोडशब्द - सराव चाचणी 01
मराठी व्याकरण
चौथी/सातवी शिष्यवृत्ती
jodshabd, marathi vyakarn, scholarship, bts, gts, navodaya,
मराठी व्याकरण
Marathi Grammar
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) या परीक्षेमध्ये भाषा विषयाचा शब्दसंपत्ती वरील प्रभुत्व हा घटक आणि त्यातील जोडशब्द या घटकावर आधारित सराव चाचणी आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.
हे जाणून घ्या :
जोडशब्द याचा अर्थ जोडीने येणारे शब्द. हे जोडशब्द अनेक प्रकारचे असतात.
1. एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोडशब्द. उदा. हिरवेहिरवे
2. एक शब्द अर्थपूर्ण व दुसरा निरर्थक असलेले जोडशब्द. उदा. ओबडधोबड
3. दोन वेगळी पण एकाच गटातील नामे एकत्र येऊन जोडशब्द तयार होतात. उदा. शंखशिंपले
4. एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन जोडशब्द तयार होतात. उदा. पांढराशुभ
