फेब्रुवारी - मार्च मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळेत किंचित बदल,
Slight change in 10th,12th exam timings
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४.
प्रकटन
विषय :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.
इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.
तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांचे वेळीही सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल.
सकाळ सत्रात स. १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
सकाळ सत्र
परीक्षेची सध्याची वेळ. परीक्षेची सुधारित वेळ
स. ११.०० ते दु. २.०० स. ११.०० ते दु. २.१०
स. ११.०० ते दु. १.०० स. ११.०० ते दु. १.१०
स. ११.०० ते दु. १.३०. स. ११.०० ते दु. १.४०
दुपार सत्र
परीक्षेची सध्याची वेळ. परीक्षेची सुधारित वेळ
दु.३.०० ते सायं. ६.०० दु.३.०० ते सायं. ६.१०
दु.३.०० ते सायं. ५.००. दु.३.०० ते सायं. ५.१०
दु.३.०० ते सायं. ५.३०. दु.३.०० ते सायं. ५.४०
माहितीस्तव
सौजन्य - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे