भारत टॅलेंट सर्च परीक्षेतून 28 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड...!! BTS EXAM 2024 ISRO TOUR selected student List

भारत टॅलेंट सर्च परीक्षेतून 28 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड...!!

राज्यभरातील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचा समावेश_

BTS EXAM 2024 ISRO TOUR selected student List

BTS EXAM


             edumeet Academy महाराष्ट्र यांच्या वतीने 29 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा  ( BTS ) 2024 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

 NEP 2020 शी सुसंगत, NCF 2023 मधील मार्गदर्शक तत्वांवर आधारित व थीम बेस अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रातील ही एकमेव परीक्षा असून संपूर्ण राज्यातून विद्यार्थ्यांचा भरघोस असा प्रतिसाद परीक्षेला मिळाला होता .

 राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये 250 पेक्षा अधिक केंद्रांवर पार पडलेल्या परीक्षेत,  इयत्ता 1 ली ते 8 वी चे मराठी माध्यमाचे 20 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील सर्व इयत्तांमध्ये राज्य स्तरावर इज्युमिट अकॅडमीच्या ठरवलेल्या निकषानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो संस्थेची अभ्यास सहल घडवली जाणार आहे. याव्यतिरिक्त जिल्हा व केंद्र स्तरावरही विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. 


इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय यादी

इयत्ता पहिली

प्रथम - आराध्या संदीप गोंदकर - कोल्हापूर, 

द्वितीय - राजवीर दिलीप सुतार - कोल्हापूर , 

तृतीय - सर्वेश संतोषकुमार माने - सांगली


इयत्ता दुसरी - 

प्रथम - ईश्वरी चंद्रशेखर विभुते - कोल्हापूर, 

द्वितीय - राजवर्धन महेंद्र सुपेकर - पुणे, 

तृतीय - स्वेजल बाळू घाटगे - कोल्हापूर 


इयत्ता तिसरी - 

प्रथम - श्रीजा संदेश झरेकर - पुणे , 

द्वितीय - शौर्य सरदार कालसपनवार - कोल्हापूर, 

तृतीय - गणेश वसंत पाटील - कोल्हापूर


इयत्ता चौथी - 

प्रथम - युवराज दत्तात्रेय पांचाळ - धाराशिव , 

द्वितीय - अनुष्का शैलेश लाड - छत्रपती संभाजीनगर,  समृध्दी श्रीकृष्ण होडगे - कोल्हापूर आणि शर्वरी मुरलीधर लगड - छत्रपती संभाजीनगर, 

तृतीय - हर्षवर्धन कांतीलाल गुंड - अहमदनगर आणि अर्णव सुषेन मुळे - सोलापूर.


इयत्ता पाचवी - 

प्रथम - पूर्वा राजेंद्र पवार - सातारा आणि प्राची सुनील शेंडे - सांगली, 

द्वितीय - स्वरा सचिन पाटील - सातारा , 

तृतीय - संचीता संभाजी पाटील - सिंधुदुर्ग 


इयत्ता सहावी - 

प्रथम - मृणाल अभिजित पाटील - सांगली , 

द्वितीय - अजिंक्य सोमनाथ खेडकर - अहमदनगर , 

तृतीय - ओम महादेव चौरे - सोलापूर 


इयत्ता सातवी - 

प्रथम - अनुष्का संदीप काकडे - अहमदनगर, 

द्वितीय - भक्ती भागवत शिंदे - अहमदनगर , 

तृतीय - प्राप्ती आबासाहेब जाधव - अहमदनगर.


इयत्ता आठवी - 

प्रथम -  स्वरा विनीत हरताळकर - जळगांव , 

द्वितीय - सर्वेश रामदास नरसाळे - अहमदनगर, 

तृतीय - साई केशव घुगे  - सातारा 


( चौकट : "एज्यूमिट अकॅडमी आणि भारत टॅलेंट सर्च परिवाराने परीक्षेच्या माध्यामातून अतिशय पारदर्शक पद्धतीने इस्रो अभ्यास सहलीसाठी विद्यार्थ्यांची केलेली निवड सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी व प्रोत्साहन देणारी आहे. हा अनुभव निवड झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असेल ...!" सागर मगदूम, शिक्षक. )


( चौकट : मी भारत टॅलेंट सर्च परीक्षेची खूप चांगली तयारी केली होती, आज जाहीर झालेल्या इस्रो सहल निवड यादीत माझे नाव बघून माझा आनंद गगनात मावत नाहीये. माझ्या या यशात माझे मार्गदर्शक शिक्षक , माझे पालक आणि माझ्या मित्र मैत्रिणीचा ही खूप मोठा हात आहे. भविष्यात पुन्हा भारत टॅलेंट सर्च परीक्षेला बसून - भारताची संसद पाहण्याचे यश मला मिळवायचे आहे ." श्रिजा संदेश झरेकर )

( चौकट : "भारत टॅलेंट सर्च च्या वतीने आम्ही प्रत्येक इयत्तेतील प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो सहल तर द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थांना राज्यात इतर ठिकाणी शैक्षणिक सहल घडवणार होतो. परंतु विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यांच्या गुणांमध्ये असलेले अत्यंत कमी अंतर या सगळ्या गोष्टींचा विचार करून यंदा आम्ही प्रत्येक इयत्तेतील प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीनही क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना इस्रो अभ्यास सहलीला नेण्याचा निर्णय घेतला आहे. " - राज्य परीक्षा नियंत्रक, भारत टॅलेंट सर्च. )

               एज्युमिट अकॅडमी व भारत टॅलेंट सर्च परिवाराच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. संपूर्ण निकाल व गुणवत्ता यादी पाहण्यासाठी अकॅडमीच्या www.btsedumeet.com  या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन संचालकांनी केले आहे.

BTS EXAM 2025 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post