उतारा क्रमांक 03 - मराठी (भाषा) उतारे,
Marathi passage 03,
खाली दिलेल्या उतारा लिहून घेऊ शकता किंवा कॉपी करून घेऊ शकता.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा इत्यादी विविध स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त भाषा विषयाची उतारे आपण मोफत स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.
यापूर्वीच्या उताऱ्यांची लिंक खाली दिलेली आहे.
उतारा क्रमांक 01
https://www.gsguruji.in/2024/07/01-marathi-utare.html
उतारा क्रमांक 02
https://www.gsguruji.in/2024/07/02.html
खाली दिलेल्या उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
या उताऱ्या खालील प्रश्नांची उत्तरे शेवटी दिलेली आहे.
बिरबलाचे खरे नाव महेश दास होते. तो लहान मुलगा असल्यापासून थोर मुघल सम्राट अकबर यांच्या दरबारात राहिला होता. मोठा झाल्यावर बिरबल विद्वान व हुशार बनला. कठीण समस्या सोडवण्यास त्याने बऱ्याच वेळा अकबरास मदत केली.
एके दिवशी अकबराने आपल्या काही मित्रांना भोजनास बोलावले होते. पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी एका कथा निवेदकाला बोलवले होते. त्याने पाहुण्यांना काही विलक्षण कथा ऐकवल्या ,अकबराने कथा निवेदकाला सोन्याच्या नाण्याची थैली . तो माणूस इतका कृतज्ञ होता की, अकबराच्या स्तुती दाखल तो म्हणाला, महाराज आपण स्वर्ग आधीपति इंद्रा पेक्षा हि महान आहात.
नंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना अकबराने विचारले. मी खरोखरीच इंद्रापेक्षा महान आहे का? अकबर सम्राट असल्यामुळे सगळे पाहुणे म्हणाले, अर्थात ! महाराज, मग अकबराने बिरबलाला तोच प्रश्न विचारला आणि बिरबलाने उत्तर दिले. होय, नक्कीच ! आपण जास्त महान आहात कारण आपण अशी एक गोष्ट करू शकता की जि इंद्राला करता येत नाही .जेव्हा अकबराने विचारले की ती गोष्ट कोणती? तेव्हा बिरबल म्हणाला, आपण एखाद्या दुष्ट माणसाला आपल्या राज्याबाहेर घालू शकता पण इंद्र तसे करू शकत नाही कारण सगळे जगच त्यांचे आहे.