10th Board Result 2026, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल जाहीर

10th Board Result 2026, 



माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल जाहीर

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ निकालाबाबत

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Direct link 

https://sscresult.mahahsscboard.in/


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०८ मे, २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.


1. https://results.digilocker.gov.in


2. https://mahahsscboard.in


3. https://sscresult.mkcl.org


4. https://results.targetpublications.org


5. https://results.navneet.com


6. https://www.tv9marathi.com


7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results.


परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

10th SSC BOARD RESULT


सदर निकालाबाबतचा अन्य तपशील खालीलप्रमाणे-


१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०९/०५/२०२६ ते शनिवार, दिनांक २३/०५/२०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.


२) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.


३) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध


४) जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३ परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यां संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाब स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post