संख्यांचा चढता व उतरता क्रम, तुलना - चाचणी क्र 01,
गणित - नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल,
Math test, Ascending, descending order,
शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल, मंथन, बी टी एस, एम टी एस, श्रेया, आय एम विनर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी गणित विषयाच्या घटक निहाय सराव चाचण्या सोडवा.
संख्यांचा चढता व उतरता क्रम, तुलना
हे जाणून घ्या :
(1) संख्याचा चढता व उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्याची तुलना करावी लागते.
(2) चढता क्रम - दिलेल्या संख्यांची चढत्या क्रमाची मांडणी करताना क्रमाने लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत केली जाते.
उदा. 7924, 9834, 3450, 2500 चढता क्रम 2500, 3450, 7924, 9834
(3) उतरता क्रम - दिलेल्या संख्यांची उतरत्या क्रमाने मांडणी करताना क्रमाने मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत केली जाते.
उदा. 3054, 2480, 4576, 7001 उतरता क्रम 7001, 4576, 3054, 2480
(4) तुलना संख्यांचा लहान-मोठेपणा ठरविणे म्हणजे संख्यांची तुलना करणे होय. तुलना करण्यासाठी <, >, = ही चिन्हे वापरतात.
चिन्हांचा अर्थ
i) < च्यापेक्षा मोठा
ii) > च्यापेक्षा लहान
iii) = समान