लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे- गणित
Forming smaller and larger numbers
सराव चाचणी क्रमांक 01
हे जाणून घ्या :
@ दिलेले अंक वापरून संख्या बनवताना प्रश्नात सांगितलेल्या अटींचा विचार करावा.
@ मोठ्यात मोठी संख्या बनवताना दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावावा.
@ लहानात लहान संख्या बनवताना दिलेल्या अंकांचा चढता क्रम लावावा.
@ लहानात लहान संख्या बनवताना जर दिलेल्या अंकांमध्ये 0 असेल तर अंकांचा चढता क्रम लावताना शून्य हे सुरुवातीला न घेता दुसऱ्या स्थानावर असावे.
उदा. 1, 0, 5, 7, 6 यांपासून लहानात लहान पाच अंकी संख्या बनवताना; अंकांचा चढता क्रम पुढीलप्रमाणे 0, 1, 5, 6, 7 परंतु 01567 ही संख्या पाच अंकी होणार नाही. म्हणून, 0 व 1 यांची स्थानांची अदलाबदल करावी आणि तयार होणारी संख्या 10567 ही असेल.
@ काही वेळा अंकांची संख्या कमी दिलेली असते. त्यावेळी अंकांची पुनरावृत्ती करावी लागते. अशा वेळी लहानात लहान संख्या बनवताना लहान आणि मोठ्यात मोठी बनवताना मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करावी.
उदा. (1) 1,0,4,6 या सर्व अंकांचा वापर करून तयार होणारी लहानात लहान संख्या 100046
(2) 4,9,8,3 या सर्व अंकांचा वापर करून तयार होणारी सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या = 999843
@ प्रश्नातील सूचना नीट वाचणे आवश्यक आहे. उदा. लहानात लहान सम / विषम तसेच मोठ्यात मोठी विषम / सम अशी संख्या विचारली जाते.
@ अटीतील संख्या बनवताना प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे की पुनरावृत्ती करायची आहे. या प्रश्नातील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, श्रेया, navodaya, scholarship, BTS, MTS, BDS, myvision, Jnvst,
विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती नवोदय सैनिक स्कूल तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये गणित विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी नियमितपणे घटक निहाय चाचण्या सोडवा.